Create AI Video
Create AI Video

जलसमाधी आंदोलन 28 तासांनंतर स्थगितःउन्मेष पाटील

general Life
2024-08-25 21:25:31
जलसमाधी आंदोलन 28 तासांनंतर स्थगितः माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात नार पारसाठी गिरणा नदीपात्रात सुरू होते आंदोलनगुजरातकडे जाणारे पाणी नार-पार-गिरणा योजनेकडून वळवण्याच्या मागणीसाठी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी शुक्रवार सकाळी ११ वाजेपासून मेहुणबारे येथे गिरणा नदीच्या पात्रात सुरू केलेले जलसमाधी आंदोलन तब्बल २८ तासानंतर मागे घेण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात सचिव पातळीवर लवकरच बैठक बोलावून तोडगा काढण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे माजी खासदार यांनी जाहीर केले

Related Videos